महाराष्ट्र राज्य धोबी ,परीट, वरठी सर्व भाषिक समाज महासंघाचे आठव्या वर्धापन दिनानिमित्त श्री संत गजानन महाराज शेगाव येथे अधिवेशन आयोजित करण्यात आले .
अधिवेशनाचे उद्घाटक मा.ना.आकाश भाऊ फुंडकर, कामगार मंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई, यांच्या हस्ते झाले . मुख्य अतिथी मा.ना. प्रतापराव जाधव, केंद्रीय आयुष मंत्री, नवी दिल्ली, तर विशेष अतिथी मा.संजय भाऊ कुटे , आमदार तथा माजी मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई ,यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मा.डी .डी. सोनटक्के ,संस्थापक अध्यक्ष ,सर्व भाषिक महासंघ यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले .सध्याच्या बदलत्या परिस्थितीनुसार तरुणांना नवीन उपक्रम व संधी निर्माण होत आहेत. त्या अनुषंगाने समाज हितासाठी महासंघामध्ये सुद्धा विचार मंथनाची गरज आहे. याकरिता अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा.डी .डी. सोनटक्के यांनी माध्यमांशी बोलताना मत व्यक्त केले.हॉटेल गजानन इन ,संत गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेज जवळ, खामगाव रोड, शेगाव येथे होणाऱ्या अधिवेशनात सर्व भाषिक समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन – महासंघाचे मुख्य महासचिव जयरामजी वाघ, महासचिव संजय सुरडकर ,ज्येष्ठ मार्गदर्शक अशोकराव राऊत, कोषाध्यक्ष संजय कनोजिया, प्रदेश महिला अध्यक्ष अरुणाताई रायपुरे ,प्रदेश कार्यालयीन सचिव गणेश खर्चे, विदर्भ अध्यक्ष शंकर परदेशी, बुलढाणा जिल्हाध्यक्ष महादेव इदोकार व गोपाल भाग्यवंत सर्व समाज बांधवानी उपस्थित राहावे असे आव्हान महासंघा तर्फे करण्यात आले आहे
READ ALSO : https://ajinkyabharat.com/eid-e-miladunnabicha-procession-crosses/