आकोलखेड – दरवर्षी प्रमाणे यंदाही( दि .५ ) रोजी आकोलखेड येथे ईद-ए-मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैही वसल्लम यांचा शोभायात्रा मोठ्या उत्साहात, आनंदात आणि धार्मिक जल्लोषात काढण्यात आला.ही शोभायात्रा वार्ड क्र. २ येथील पाण्याच्या टाकीजवळून सुरू होऊन गावातील प्रमुख रस्त्याने प्रदक्षिणा घालत जामा मशिदीपाशी शांततेत समारोप करण्यात आली. शोभायात्रेदरम्यान पैगंबर मोहम्मद सल्लल्लाहु अलैही वसल्लम यांच्या जीवनप्रवासाविषयी, त्यांनी मानवजातीस दिलेला शांतीचा आणि मानवतावादी संदेश याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. ते सर्व जगासाठी रहमत म्हणून पाठवले गेले असून, त्यांनी मानवतेवर आणि बंधुभावावर भर दिला, हे या प्रसंगी स्पष्ट करण्यात आले.याचबरोबर अल-हुसैनी सोशल वेलफेअर मल्टीपरपज सोसायटी तर्फे “झाडे लावा – झाडे जगवा” ही मोहिम राबविण्यात आली. यातून ग्रामस्थांना पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावण्याचे आवाहन करण्यात आले.शोभायात्रेत जामा मशिदीचे इमाम, अध्यक्ष ईसा कुरेशी, जान मुहम्मद, शेख सलाम मिस्त्री, जुनैद शाह, शमशेर पठाण आदी मान्यवर, तसेच शोभायात्रा कमिटीचे सदस्य, अल-हुसैनी सोशल वेलफेअर मल्टीपरपज सोसायटीचे सदस्य, गावातील मुस्लिम बांधव, पोलिस पाटील अमरनाथ शेगोकार, पत्रकार धन्नु बायवार आदींचा सक्रिय सहभाग होता.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/chamchadapa-light-aani-pudhachayach-kshani-blindness/