बाळापूर – ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचोली गणू येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त विद्यार्थ्यांनी स्वयंशासन राबवत शिक्षकांची भूमिका साकारली आणि शिक्षणाचा आनंद घेतला.कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक प्रशांत आकोत यांच्या हस्ते करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांमधून नियुक्त केलेल्या मुख्याध्यापिका तनुजा सदार, उपमुख्याध्यापक साची सरदार, पर्यवेक्षक अमर पारवे आदींनी शाळेचे संपूर्ण नियोजन पाहिले. विविध वर्गांतील विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून शिकवण्याचा अनुभव घेतला.या कार्यक्रमात पायल शिंदे, अथर्व अंभोरे, सोहम डोईफोडे, सोहम कळसकार, खुशी पारवे, मानवी वाघ, प्रतीक्षा इंगळे, अर्पिता, श्रेया, खुशी, रिया, पुनम आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विविध वेशभूषेमुळे कार्यक्रमाला रंगत आली.कार्यक्रमाला केंद्रप्रमुख माधव काळे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या उपक्रमांचे कौतुक केले. उपस्थितांना सुरुची भोजनाचा लाभ देण्यात आला. नियोजन प्रमुख म्हणून संगीता भटकर व सुनील बाहे यांनी कामकाज पाहिले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक प्रशांत आकोत, शिक्षिका संगीता भटकर, शिक्षक सुनील बाहे, विकास वाडकर, ज्योस्ना गोतमारे तसेच कर्मचारी तुळसाबाई सरदार आणि अण्णपूर्णा गोतमारे यांनी परिश्रम घेतले. शेवटी आभार प्रदर्शन विकास वाडकर यांनी केले.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/akolid-gharguti-ganesh-visarjanala-suruwat/