अकोला- महाराष्ट्रात गणेशोत्सव सध्या जोरदार उत्साहात साजरा केला जात आहे, परंतु काही मंडळे फक्त सणापुरतेच नव्हे, तर सामाजिक प्रबोधन आणि लोककल्याण यांचा घटक जोडून उत्सव साजरा करतात. अकोल्याच्या पातूर येथील खडकेश्वर गणेशोत्सव मंडळ याच मंडळांपैकी एक आहे.यावर्षी मंडळाने आदिवासी घराचा देखावा साकारला आहे. छोटी झोपडी, पारंपरिक घरगुती साहित्य, जुन्या काळातील वारली पेंटिंग आणि झोडीने सजवलेली झोपडी या माध्यमातून गणेश भक्तांना भारताच्या पुरातन संस्कृतीचे दर्शन घडवले. तसेच गणेश मूर्तीही पारंपरिक वस्तूंमधून तयार करण्यात आली असून, पाटे, जुने पितळीचे भांडे अशा साहित्याचा वापर करण्यात आला आहे.याव्यतिरिक्त, मंडळाने पुरातन शेती अवजार आणि घरगुती वस्तूंचे प्रदर्शन सादर केले आहे. याचा उद्देश नवीन पिढीला आपल्या भारतीय संस्कृतीशी ओळख करून देणे हा आहे. मंडळाने कलात्मकतेतून समाजाभिमुख कार्याचे उत्तम उदाहरण सादर केले आहे.
विश्वनाथ इंगळे सदस्य, खडकेश्वर गणेश उत्सव मंडळ, पातूर, अकोला यांनी सांगितले की, “नुसता डीजे-ढोलताश्यांचा कर्कश निनाद न करता, समाजोपयोगी गणेशोत्सव साजरा करणे मंडळाचे उद्दीष्ट आहे.”खडकेश्वर गणेश उत्सव मंडळाने सलग दोन वर्षे राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ पुरस्कार पटकावला असून, यामुळे त्यांच्या अथक परिश्रमाची आणि समाजाभिमुख कार्याची दखल घेतली गेली आहे.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/parsodamarutiraaychi-187-varshchi-yatra-concluded/