पळसोदमारुतीरायाची 187 वर्षांची यात्रा संपन्न;

प्राचीन पळसोदमारुतीरायाची यात्रा

अकोट तालुक्यातील पळसोद गावात पळसोदमारुतीरायाची 187 वर्षांची परंपरा जपत येत असलेली यात्रा आज उत्साहात संपन्न झाली. ही यात्रा पवनसुत हनुमानाच्या भक्तांसाठी महाराष्ट्रातील आगळावेगळ्या जत्रांपैकी एक मानली जाते.यात्रेच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी म्हटले की, अनेक वर्षांपूर्वी पावसामुळे दुष्काळाची भीती होती, पण पवनसुत हनुमानाला साकडे घालल्यावर जोरदार पाऊस झाला आणि तेव्हापासून पळसोद वाशी ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पाडली जाते.या वर्षीच्या यात्रेतही सालाबाद प्रमाणे मोठी गर्दी पहायला मिळाली. पळसोद गावातील पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. महाप्रसादासाठी 75 किलो गंगाफळाच्या डेऱ्यामध्ये केवळ एक पाव तेल वापरून भाजी तयार केली जाते, जी भक्तांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.गावकऱ्यांचे आणि स्वयंसेवकांचे योगदान मोठे असून, यात्रेला सुव्यवस्था, स्वच्छता आणि भक्तिभाव कायम ठेवण्यासाठी प्रत्येकाने मेहनत घेतली. पळसोदमारुतीरायाची ही यात्रा आजही उत्साह, श्रद्धा आणि भक्तिभावाने परिपूर्ण आहे.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/ips-anjana-krishna-wideo-call-ajit-pawranchi-first-response-sumor/