काटेपूर्णा – प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाचे सुरक्षेच्या दृष्टीने 8 दरवाजे उघडले गेले आहेत. आज दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता प्रत्येकी 60 सें.मी. उंचीने दरवाजे उघडण्यात आले. यामुळे एकूण 384.46 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे.धरणाकडे येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहानुसार विसर्गामध्ये वेळोवेळी बदल केला जाईल, असे काटेपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले आहे.नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्र ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, ग्रामस्थांनी सुरक्षित ठिकाणी राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असेही सांगितले आहे.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/baramatit-obc-society-accessory/