सोलापूर (प्रतिनिधी): सोलापूर जिल्ह्यातील अवैध मुरूम खनन तपासादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात फोनवर झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात आणि प्रशासनात मोठी चर्चा रंगली आहे.
नेमकं काय घडलं?
31 ऑगस्ट रोजी माढा तालुक्यातील कुर्डू गावात अवैध मुरूम उपसा प्रकरणी कारवाई सुरू होती.
यावेळी ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला.
भाषेच्या अडथळ्यामुळे अधिकाऱ्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन जोडला.
या संभाषणात पवारांनी वापरलेल्या भाषेमुळे नवा वाद उफाळला.
व्हिडिओमध्ये काय दिसतं?
कारवाईदरम्यान ग्रामस्थ व पोलिसांमध्ये झालेली बाचाबाची.
फोनवर अजित पवार आणि आयपीएस अंजना कृष्णा यांच्यात झालेली चर्चा.
अधिकाऱ्यांनी घेतलेली भूमिका आणि ग्रामस्थांची नाराजी.
कोण आहेत अंजना कृष्णा?
आयपीएस अधिकारी, करमाळा विभागाच्या डीवायएसपी पदावर कार्यरत.
मूळची दक्षिण भारतातील.
सध्या सोलापूर जिल्ह्यातील अवैध खनन, कायदा-सुव्यवस्था प्रकरणात सक्रिय भूमिका बजावत आहेत.
या संपूर्ण घटनेमुळे अजित पवारांचा हस्तक्षेप, आयपीएस अधिकाऱ्यांची ठाम भूमिका आणि ग्रामस्थांची नाराजी यावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/gavakyaanchaya-attendance/