इन्नाणी महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

संस्कार, शिक्षण आणि उद्योग यांचा संगम घडवण्याचे आवाहन

कारंजा (लाड) –  स्थानिक स्वा. से. श्री. क. रा. इन्नाणी महाविद्यालयात शिक्षक दिन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात नगरपरिषद कारंजा लाडचे मुख्याधिकारी मा. महेश वाघमोडे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन केले.प्राचार्य डॉ. आर. एम. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास ब्लूचिप कॉन्व्हेंटचे आनंद इन्नानी, उपप्राचार्य प्रा. ए. डी. बरडे, आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा. डॉ. एन. जी. जाधव, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. एल. डी. खरड, शिक्षक दिन समिती समन्वयक प्रा. डॉ. टी. डी. राजगुरे, तसेच प्रा. अनुप नांदगावकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या वार्षिक अंकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते झाले. रसायनशास्त्र विभागाचे प्रा. वैजयंत आर. पाटील यांनी प्रथम प्रयत्नात सेट परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा शॉल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.पारंपरिक वेशभूषा दिन साजरा करून विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती जपण्याचा संदेश दिला.मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलताना मा. महेश वाघमोडे यांनी शिक्षणाबरोबरच उद्योग क्षेत्रात उतरून स्थानिक गरजांनुसार शेतमाल प्रक्रिया उद्योग सुरू करण्यावर भर दिला. संगणक शिक्षणाचा समाजहितासाठी उपयोग करावा, कठोर मेहनतीनेच यश मिळते, असे मौल्यवान विचार त्यांनी विद्यार्थ्यांशी शेअर केले.प्राचार्य डॉ. पाटील यांनी शिक्षणासोबत संस्कारांची जपणूक करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील सामाजिक-आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण करत शेतकरी वर्गाने नियोजनबद्ध पद्धतीने मेहनत करावी असे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. टी. डी. राजगुरे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. अनुप नांदगावकर यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा. डॉ. एन. जी. जाधव यांनी केले. सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे शिक्षक दिन सोहळा यशस्वी पार पडला.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/asia-cup-2025-bharatacha-pahila-face-10-supportmen-uaeeevit-dup/