कौलखेड (अकोला) येथे सुरू असलेल्या गणेशोत्सवात गुरुवारी सायंकाळी श्री गजानन नगरीचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या मंचावर एक आगळावेगळा काव्यसोहळा रंगला. सुप्रसिद्ध “सायको शाहीर” अभी मुंडे यांच्या लेखणीतून उतरलेली श्रीराम प्रभूंवरील प्रभावी रचना प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आली.या विशेष कार्यक्रमाला सप्त खंजिरी वादक संदीपपाल महाराज उपस्थित होते. तर, ही रचना युवराज विठ्ठल महल्ले यांनी आपल्या दमदार आवाजात आणि भावपूर्ण अभिव्यक्तीतून सादर केली. त्यांच्या सादरीकरणाने सभागृहात उपस्थित भाविक व नागरिक क्षणभर मंत्रमुग्ध झाले.गणेशोत्सवाच्या पारंपरिक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना या रचनेच्या सादरीकरणामुळे एक वेगळाच अध्यात्मिक स्पर्श मिळाला. श्रीराम प्रभूंवरील भावकाव्य आणि भक्तिमय वातावरणामुळे मंडपात एक आगळीच उर्जा निर्माण झाली.गणेशभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रमाला दाद दिली. त्यामुळे कौलखेडातील गणेशोत्सवाला यंदा अधिकच विशेष रंगत आल्याची भावना व्यक्त होत आहे.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/telharachaya-bhokar-gavat-vikaskamana-break/