राज्यातील अनुकंपा तत्त्वावरील रखडलेल्या पदांची भरती लवकरच सुरु; १५ सप्टेंबरपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया राबवली जाणार.
बातमी:गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनुकंपा तत्त्वावरील
नोकऱ्या भरण्याचा राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
राज्यभरातील जवळपास 9,658 जागा आता भरल्या जाणार आहेत.
यामध्ये चतुर्थ श्रेणीतील पदेही समाविष्ट आहेत.अनुकंपा तत्त्वानुसार,
राज्यातील शासकीय व निमशासकीय संस्थांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचे निधन झाल्यास
त्यांच्या पात्र कुटुंबियांना त्या विभागात नोकरी देण्याची तरतूद आहे.
ही धोरण 1973 पासून लागू असून वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत.
सर्वाधिक उमेदवार प्रतीक्षेत महानगरपालिकांमध्ये 5,228, जिल्हा परिषदांमध्ये 3,705 आणि नगरपालिकांमध्ये 725 आहेत.
नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक 506 उमेदवार प्रतीक्षेत आहेत, त्यानंतर पुणे (348), गडचिरोली (322) आणि
नागपूर (320) यांचा क्रमांक आहे.सरकारने ही नियुक्ती प्रक्रिया
१५ सप्टेंबर 2025 पासून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्याचा निर्णय घेतला आहे,
ज्यामुळे प्रतीक्षेत असलेल्या सुमारे 10 हजार उमेदवारांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
याचवेळी, महसूल विभागाच्या पुणे आयुक्तांच्या जीआरमुळे काही जिल्ह्यांमध्ये नव्या वादांची शक्यता आहे.
खासगी पद्धतीने काही अतिरिक्त प्रमाणपत्र वाटपासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.
READ ALSO :https://ajinkyabharat.com/wp-admin/post.php?post=20041&action=edit&classic-editor