महाराष्ट्रातील नदीकाठच्या गावांना धोक्याची घंटा!”

"सतर्क राहा! महाराष्ट्रात मुसळधार पाऊस

मुंबई – भारतीय हवामान विभागाने राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मागील काही दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि घाटमाथा परिसरात आजही जोरदार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाची तीव्रता वाढली आहे.

अलर्ट:

  • कोकण, उत्तर महाराष्ट्र व घाटमाथा भागासाठी ऑरेंज अलर्ट

  • मराठवाडा काही भागांसाठी येलो अलर्ट

  • विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

रात्री ठाणे, रायगड, पालघर, नंदुरबार, नाशिक आणि पुण्यातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला होता. पुढील दोन दिवसांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गिरणा धरणाची स्थिती:

  • उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक गिरणा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.

  • धरणातून नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील आठ तालुक्यांना पाणीपुरवठा केला जातो.

  • गिरणा धरणात सध्या 96% पेक्षा जास्त जलसाठा आहे.

  • धरण सुरक्षिततेसाठी धरणाचा एक दरवाजा 20 सेंटीमीटर उघडण्यात आला आहे.

  • गिरणा धरणातून 814 क्यूसेक्स आणि मण्याड धरणातून 417 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

  • नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

विशेष सूचना: नागरिकांनी नदीकाठच्या परिसरात सतर्कता बाळगावी. पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य खबरदारी घेणे आवश्यक आहे.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/drone-camera/