“ड्रोन कॅमेरे, १ हजार पोलिस आणि ध्वनी मर्यादा – अकोटात मिरवणुकीचे निर्बंध जाहीर”

पोलिस

अकोटात गणेशोत्सव व ईदमिरवणूक सुरक्षिततेसाठी शांतता समितीची सभा

अकोट: गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर अकोट ते अकोला रोडवरील हॉटेल श्रीहरी लॉन येथे अकोट शहरातील शांतता समितीची सभा आयोजित करण्यात आली. यामध्ये अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या विशेष उपस्थितीत चर्चा झाली.सभेत अकोटचे उपविभागीय पोलिस अधिकारी निखिल पाटील, उपविभागीय महसूल अधिकारी मनोज लोणारकर, न.प.वे मुख्याधिकारी डॉ. नरेंद्र बेबरे, अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल माळवे आणि अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे उपस्थित होते.अकोट शहरात गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत साजरा होत असून भक्तिमय वातावरण राहिले आहे. ७ सप्टेंबर रोजी शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक निघणार असून, ९ सप्टेंबर रोजी मुस्लीम बांधवांची ईद मिरवणूक पार पडणार आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी नागरिकांना आवाहन केले की, विसर्जन मिरवणूक आणि ईददरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये. सोशल मिडियावर भावना दुखावणारे पोस्ट टाळावेत, मिरवणुकीत दारू सेवन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. तसेच धार्मिक स्थळांच्या जवळ हिंसक वाद किंवा हुल्लडबाजी करू नये.

महत्त्वाचे नियम:

  • मिरवणुकीदरम्यान फक्त एक बेस व एकाच टॉप  डीजेची परवानगी असेल; आवाज ५५ डेसीबलपेक्षा जास्त जाणार नाही.

  • लेझर लाईट लावण्यास परवानगी नाही.

अकोट शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी तब्बल १ हजार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच, मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरे व व्हिडिओ शूटिंग देखील राबवले जाणार आहेत.सभेचे प्रास्ताविक अकोट शहर ठाणेदार अमोल माळवे यांनी केले, तर आभार अकोट ग्रामीण ठाणेदार किशोर जुनघरे यांनी मानले.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/capricorn-avacle-work-completed-karanyasathi-hard-work/