पातुर तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिक नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नष्ट;

“साचलेलं पाणी, नष्ट पिकं; पातुर तालुक्यात शेतकरी चिंताग्रस्त”

पातुर (तालुका) – पातुर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे पिक मोठ्या प्रमाणात नष्ट झाले आहेत. तालुक्यातील नदीकाठच्या, नाल्याकाठच्या व शेतकऱ्यांच्या शेतात साचलेल्या पाण्यामुळे सोयाबीन, कपाशी, तूर व इतर महत्त्वाचे पिकांचे नुकसान झाले आहे.श्री शेतकरी राजा ग्रुपच्या वतीने रवि सोनोने, ज्ञानेश्वर गाडगे, गोपाल पांडे, शुभम राखोंडे, परसराम सावंत, हरिभाऊ खारोडे, अश्विन वाघमारे, गजानन गिरी, गोपाल घोगरे, शिवलाल लाहोले, अनिल कवळे आणि रामकृष्ण मेसरे यांनी तहसीलदार आणि स्थानिक प्रशासनाकडे तात्काळ आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे. तसेच पातुर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना शासनाच्या पातळीवर दिलासा देण्याची विनंती केली आहे.स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितले की, साचलेल्या पाण्यामुळे शेतांमध्ये उत्पादनाचा संपूर्ण खर्च वाचवणे अशक्य झाले असून, या परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या चिंताग्रस्त आहेत. पंचनाम्यांची प्रक्रिया पूर्ण झाली असून, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.गावातील स्थानिक शेतकरी आणि संघटनांनी सांगितले की, “निसर्गाच्या आक्रमक लहरींमुळे आमचे पिक आणि जीवशैली धोक्यात आले आहेत. शासनाने त्वरित मदत केली तरच शेतकरी पुन्हा उभा राहू शकेल,” असे त्यांनी म्हटले आहे.

read also : https://ajinkyabharat.com/excessive-picache-moth-hand-shetakyanani-panchnamayachi-magani-kelly/