अडगाव बु – अडगाव बु मंडळात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. २ व ३ सप्टेंबर रोजी झालेल्या जोरदार पावसामुळे कपाशी, सोयाबीन व तूर या पिकांचे नुकसान तर काही शेतांना तलावाचे स्वरूप आले आहे.
शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार समाधान सोनवणे यांना निवेदन सादर करून त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांनी सांगितले की, हुमणी अळीमुळे आधीच नुकसान झालेले सोयाबीन पावसामुळे पूर्णपणे नष्ट झाले असून महागाईमुळे बियाणे, खते व उत्पादन खर्च परत मिळवणेही कठीण झाले आहे.
निवेदन सादर करताना गाव प्रमुख अमोल मसुरकर, दिनेश गिऱ्हे, विलास इंगळे, देविदास ढोकणे, अनिल मानकर, रवींद्र भोपळे, छोटू निमकर्डे, मनोज राऊत, सुरेश राहाटे, बबलू ठाकूर, अशोक डवले, नाना विठ्ठलराव देशमुख, रितेश देशमुख व अजमत भाई उपस्थित होते.
पोलिस प्रशासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले असून पुढील कारवाई लवकरच सुरू होणार आहे.
read also :https://ajinkyabharat.com/narendra-modi-eu-nityanshi-russia-sanghayar-discussion-kelly/