नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युरोपियन परिषद अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन परिषदेच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांच्याशी फोनद्वारे संयुक्तपणे चर्चा केली. या संवादादरम्यान युक्रेन-रशिया युद्धाबाबत भारताची भूमिका स्पष्ट करण्यात आली.मोदींनी या चर्चेत व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, संरक्षण, सुरक्षा व पुरवठा साखळीतील लवचिकता यांसह द्विपक्षीय संबंधांची वृद्धी यावरही भर दिला. युक्रेन-रशिया संघर्ष लवकरात लवकर शांततेत संपुष्टात यावा, आणि या भागात स्थैर्य व सुरक्षितता निर्माण व्हावी, ही भारताची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.यावेळी मोदींनी अँटोनियो कोस्टा आणि उर्सुला वॉन डेर लेयन यांना आगामी भारत-युरोपियन महासंघाच्या परिषदेस भारतात आमंत्रितही केले.
read also : https://ajinkyabharat.com/gharatil-vadatun-jeevaghena-halla/