अकोला जिल्हा समता परिषदेच्यावतीने ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर ठाम भूमिका मांडत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी जिल्ह्यातील समता परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.निवेदन देताना अकोला जिल्हा समता परिषदेचे अध्यक्ष गजानन म्हैसणे, अमरावती विभागीय संघटक गजाननराव इंगळे, माजी आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार हरिभाऊ भदे, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, माजी आमदार ज्ञानदेवराव ठाकरे, जि.प. माजी अध्यक्षा संगीता आढाव, माया इरतकार, प्रकाश बिरकड, जिल्हा कार्याध्यक्ष विजय कौशल, शत्रुघ्न बिरकड, शहराध्यक्ष श्रीराम पालकर, उपाध्यक्ष राम जोगतोळे, विनोद मिरगे यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.या वेळी कार्यकर्त्यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणासंबंधी सविस्तर चर्चा करत सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. आरक्षणाच्या मुद्यावर सरकारने समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करत हा अन्यायकारक निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली.निवेदन देताना गजानन भारते, विजय गाडगे, सदाशिव शेळके, अशोक बोळे, शंकर काकड, दामोदर हागे, मधुकर देवकर, चक्रधर राऊत, गजानन वाघमारे, महादेवराव साळवे, सुनील डाकोलकर, सुरेश बोचरे, किशोर सोनवणे, नंदकिशोर बहादुरे, अंकुश राऊत, अॅड. प्रकाश दाते, गणेशराव काळपांडे, जगदीश तायडे, नरेंद्र खवले, संतोष बिलबिले, दीपक गोलडे, भास्कर राऊत, अशोक भराड यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.या निवेदनानंतर समता परिषदेच्या पुढील आंदोलनाची दिशा काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/ganeshotsav-shanti/