“गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज”

बाळापूरात पोलीस अधीक्षकांची शांतता बैठक

बाळापूर- गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बाळापूर येथे गुरुवारी (दि. ४ सप्टेंबर) उपविभागीय शांतता आढावा बैठक घेण्यात आली. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत गणेश मंडळाचे पदाधिकारी, शांतता समिती सदस्य, पत्रकार, पोलीस पाटील व विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीदरम्यान गणेश मंडळांच्या समस्या ऐकून घेतल्या गेल्या. तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिले. गणेशोत्सव पारंपरिक वाद्य व सांस्कृतिक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित केल्याची माहितीही देण्यात आली.या बैठकीला बाळापूर उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन, तहसीलदार वैभव फरतारे, नगरपरिषद बांधकाम विभागाचे अभियंता गेडाम, नगरपरिषद प्रतिनिधी ठाकरे, विद्युत विभागाचे कार्यकारी उपअभियंता शेगावकर यांच्यासह उपविभागातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.सुमारे ४०० ते ४२५ गणेश मंडळांचे पदाधिकारी या बैठकीला हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एपीआय पंकज कांबळे यांनी केले. प्रास्ताविक उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन यांनी केले तर आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक अनिल जुमळे यांनी केले.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/rural-journalist-sanghacha-annual-meant/