ग्रामीण पत्रकार संघाचा वार्षिक मेळावा उत्साहात संपन्न

पत्रकार संघाच्या मेळाव्यात मान्यवरांचा सत्कार

अकोट – ग्रामीण पत्रकार संघ, अकोट तालुक्याचा वार्षिक मेळावा व सत्कार सोहळा शांतीवन अमृततीर्थ सजल विहीर (अकोली, अकोलखेड) येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात शाहू, फुले, आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. तसेच स्व. शैलेश अलोने व स्व. जगन्नाथ कोंडे यांच्या जन्मस्मृती दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.या मेळाव्याचे अध्यक्षस्थान गजानन वाघमारे (राज्याध्यक्ष, पत्रकार संघ) यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर जुनघरे उपस्थित होते. राज्यसचिव राजेश डांगटे यांनी स्मृतींजली अर्पण करून पत्रकार संघाच्या कार्याबाबत मार्गदर्शन केले.यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे, ग्रामपंचायत अधिकारी अमेश खारोडे, केंद्रप्रमुख उमेश चोरे, डॉ. मयूर व्यवहारे, डॉ. दुर्गेश पुरोहीत, डॉ. योशान मनीयार, उद्योगपती ज्ञानदेवराव चवाळे, शेतकरी नेते जगन्नाथ धर्मे, सुभाष सरोदे, जगन बगाडे यांचा विशेष सन्मान झाला.सत्कारमूर्तींनी मनोगत व्यक्त करताना पत्रकारांनी केलेला हा सत्कार अविस्मरणीय असल्याचे नमूद केले. पोलिस निरीक्षक जुनघरे यांनी “पत्रकार हे जनता आणि प्रशासन यामधील महत्त्वाचे दुवे आहेत” असे मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात वाघमारे यांनी अकोट तालुका पत्रकार संघाच्या उपक्रमांचे कौतुक करत आगामी राज्यस्तरीय मेळाव्याबाबत मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला जिल्हा सचिव डॉ. संतोष ताकोते, जिल्हा उपाध्यक्ष मनोहर गोलाईत, तसेच विविध तालुक्यांतील पत्रकार संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुत्रसंचालन तालुकाध्यक्ष नरेंद्र कोंडे यांनी केले तर आभारप्रदर्शन वैभव गुजरकर यांनी मानले.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/71-janananchaya-yogadanachi-discussion-everywhere/