अकोट – अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या ग्राम शिवपूर येथे जिजाऊ गणेशोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मंगळवार, दि. २ सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.शिबिराचे उद्घाटन सरपंच माया महल्ले यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात एकूण ४१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. अकोला जिल्हा स्त्री रुग्णालय रक्तपेढीसाठी हे रक्तदान करण्यात आले. रक्तपेढीचे डॉ. जोशी व त्यांच्या टीमने शिबिरात प्रभावीपणे कामकाज पाहिले.कार्यक्रमाला गावातील तसेच पंचक्रोशीतील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. यामध्ये भास्कर महल्ले, गजानन चौकणे, गजानन पवार, गोपाल मोहोड, विशाल भालतीलक, अमोल काकड, सुभाष सुरत्ने यांचा समावेश होता.शिबिर यशस्वी करण्यासाठी गौरव पुंड, प्रतीक महल्ले, तेजस भील, ऋषी पाटील भील, प्रज्वल बोन्द्रे, सुमित भील, प्रितेश बानतकर, अमर महाले, रोहन बानतकर, आशिष महाले, शिवा महाले, अनुप महाले, योगेश भील, गोपाल महाले, विकास चौकणे, श्याम महाले आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.जिजाऊ गणेशोत्सव मंडळाने सामाजिक उपक्रमातून पुन्हा एकदा आदर्श घालून दिला असून, रक्तदात्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/government-decisions-usala-sang/