अमित मिश्राने सर्व प्रकारच्या क्रिकेटला दिला निरोप

7 दिवसांत तिसऱ्या खेळाडूची निवृत्ती

मुंबई :भारतीय क्रिकेटपटू अमित मिश्रा (Amit Mishra Retirement) यांनी सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी २५ वर्षांच्या प्रवासाचा शेवट जाहीर केला. अमित मिश्रा यांनी म्हटले की, “क्रिकेट माझे पहिले प्रेम आणि आयुष्यभराचा शिक्षक आहे. बीसीसीआय, प्रशिक्षक, सहकारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चाहत्यांचे मी आभार मानतो.  त्यांच्या पाठिंब्यामुळेच आजपर्यंतचा प्रवास शक्य झाला. आता या खेळाला काहीतरी परत देण्याची वेळ आली आहे.”

ठळक कामगिरी

अमित मिश्राने २००३ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २००८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत पदार्पण करत पहिल्याच सामन्यात पाच विकेट्स घेतल्या. २०१३ मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत १८ विकेट्स घेऊन त्यांनी जागतिक विक्रमाशी बरोबरी केली. २०१४ टी-२० विश्वचषकातही त्यांनी दहा विकेट्स घेतल्या. भारतासाठी त्यांनी २२ कसोटी (७६ विकेट्स), ३६ एकदिवसीय (६४ विकेट्स) आणि १० टी-२० (१६ विकेट्स) सामने खेळले. आयपीएलमध्ये २०२४ मध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्यांनी शेवटचा सामना खेळला.

सलग निवृत्तीच्या घोषणा

गेल्या सात दिवसांत तिसऱ्या क्रिकेटपटूने निवृत्ती जाहीर केली आहे. २७ ऑगस्ट रोजी रविचंद्रन अश्विनने आयपीएलमधून निवृत्ती घेतली . त्यानंतर २ सप्टेंबरला पाकिस्तानचा आसिफ अलीने सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. आणि आता अमित मिश्रा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/kumbhar-samajachaya-representative-amol-dada-mitkari-yanchayashi-meaningful-discussion/