अकोला – दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी विधान परिषद आमदार अमोल दादा मिटकरी
यांची कुंभार समाज विकास परिषदेच्या प्रतिनिधींनी सदिच्छा भेट घेतली.
समाजाच्या नानाविध प्रश्नांवर व विकासाच्या दिशांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली.
या भेटीत समाजाच्या अडीअडचणी,
अपेक्षा आणि शासकीय योजनांमधील लाभ यावर
आमदार मिटकरी यांच्याशी खुला संवाद साधण्यात आला.
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विधायक सूचना देत मिटकरी
यांनी योग्य त्या पातळीवर प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले.
या प्रतिनिधी मंडळात महाराष्ट्र कुंभार समाज विकास परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते रामकृष्ण साविकर,
प्रा. दिलीप आप्तुरकर, ॲड. अरुण सौदागर, संजय वाडकर,
रामचंद्र मेहरे, रामेश्वर मेहरे, सुनिल साविकर, तुळशीदास तळोकार,
योगेश इंगळे, अशोक मांगुळकर, महादेव लाहुलकर, सोनवणे (बाळापूर), रामदास गाडेकर आदींचा समावेश होता.
समाजहिताच्या या चर्चेमुळे पुढील काळात सकारात्मक दिशा मिळेल,
अशी अपेक्षा समाजबांधवांनी व्यक्त केली.
Read also : https://ajinkyabharat.com/midcil-vyaparachaya-murder-case/