अकोला : फर्निचर व्यवसायिक सुफियान खान यांच्या हत्येप्रकरणी अटक
करण्यात आलेल्या चार आरोपींची खदान पोलिसांनी मंगळवारी धिंड काढली.
३१ ऑगस्ट रोजी मलकापूरजवळील रेल्वे लाईन बोगद्याजवळ दुचाकीवर
आलेल्या चार जणांनी वाद घालून खान यांचा खून केला होता.
या घटनेनंतर परिसरात मोठी दहशत पसरली होती.
आज खदान पोलिसांनी आरोपींना एमआयडीसी परिसरात आणून घटनास्थळी पंचनामा केला.
पोलिसांनी ही कारवाई घटनास्थळ पंचनामा म्हणून दर्शवली असली तरी
प्रत्यक्षात नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठीच हा उपक्रम राबविण्यात आल्याचे समजते.
यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी पोलिसांची ही कारवाई पाहिली.
ठाणेदार मनोज केदारे म्हणाले की, “पोलिसांचा उद्देश कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे असून,
लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी हा प्रयत्न केला आहे.”
Read also : https://ajinkyabharat.com/sri-shivaji-college-plantation-under-the-undertaking-of-a-tree-mother/