अकोट : विर शिवाजी गणेश उत्सव मंडळ, श्री छत्रपती संभाजी महाराज चौक,
अकोट यांच्या वतीने दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे यावर्षीही
एक भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.
सलग १४ वर्षे गणेशोत्सवाच्या निमित्ताने हे रक्तदान शिबिर भरवण्यात येत असून,
यावेळी ३५ जणांनी रक्तदान करून समाजासमोर एक उदाहरण ठेवले.
सलग १४व्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करून ३५ रक्तदात्यांनी उदारहृदयाने रक्तदान केले
मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आणि अक्षय घायल मित्र परिवाराच्या कार्यकर्त्यांची सक्रिय सहभाग नोंदवला
समाजसेवेच्या भावनेतून चालवण्यात येणारी ही वार्षिक परंपरा विर शिवाजी गणेश उत्सव
मंडळ केवळ गणेशोत्सव साजरा करत नाही तर समाजहिताच्या
अनेक कार्यक्रमांद्वारे समाजसेवेचा संदेश पसरवत आहे.
रक्तदान हि महत्त्वाची सेवा आहे हे लक्षात घेऊन
मंडळाचे कार्यकर्ते दरवर्षी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतात.
या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना रक्त मिळण्यास मदत होते आणि समाजात सेवेची भावना पटविली जाते.