अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बोर्डी गावात
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे.
गावातील नागास्वामी महाराज मंदिर, मरी माता मंदिर, दुर्गा माता मंदिर,
एकता गणेशोत्सव मंडळ, वीर भगतसिंग गणेशोत्सव मंडळ,
आनंद बाल गणेश मंडळ व शिवप्रेमी गणेश मंडळ अशा एकूण
सात मंडळांनी गणपती बाप्पाची स्थापना भक्तिमय वातावरणात करण्यात आली.
स्थापनेसाठी ढोल-ताशांच्या गजरात,
“गणपती बाप्पा मोरया”च्या घोषणांनी गावात उत्सवी जल्लोष रंगला.
यावेळी अकोला जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अर्चित चांडक,
अकोटचे उपविभागीय अधिकारी बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
अकोट ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार किशोर जुनघरे,
उमरा बिट जमदार उमेश सोळंके व अन्य पोलिस अधिकाऱ्यांनी मंडळांना भेट दिली.
पोलिस प्रशासनाने प्रत्येक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना गणेशोत्सव शांततेत व
सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या.
तसेच गावकऱ्यांना एकोप्याने उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.
यावेळी सातही गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, तंटामुक्ती समितीचे सदस्य,
पत्रकार बांधव तसेच गावातील मान्यवर नागरिक उपस्थित होते.
गावात सर्वत्र भक्तिमय वातावरण असून उत्सव शांततेत पार पडावा
यासाठी ग्रामस्थ व प्रशासन सज्ज असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
Read also : https://ajinkyabharat.com/ganesh-utsav-and-eid-e-milad-route-march-akot/