अकोट- अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील पणज, अकोली जहागीर, व अकोलखेड
या गावांमध्ये २९ सप्टेंबर २०२५ रोजी गणेश उत्सव व ईद-ए-मिलादनिमित्त
शांतता व कायदा सुव्यवस्थेसाठी रूट मार्च आयोजित करण्यात आला.
उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांच्या उपस्थितीत,
निरीक्षक किशोर जुनघरे व उपनिरीक्षक काठोले मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली
अकोलखेड ग्रामपंचायत पटांगण येथून रूट मार्चला प्रारंभ झाला.
शहीद जवान स्मारक, जामा मस्जिद, दुर्गा माता मंदिर, गणेश मंदिर,
गजाननराव बोचे यांचे घर आणि ग्रामपंचायत
कार्यालयासमोर या मार्गावरून रूट मार्च पार पडला.
या मोहिमेत ६ अधिकारी, ६३ पोलीस अंमलदार, ६७ होमगार्ड सहभागी झाले.
सकाळी १० वाजता सुरू झालेली ही शिस्तबद्ध मोहीम दुपारी १२.३० वाजता संपली.
शिस्तबद्ध बंदोबस्तामुळे दोन्ही सण शांततेत पार पाडण्याचा विश्वास स्थानिक प्रशासनाने व्यक्त केला आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/ganesh-visarjan-mirvanukichya-margavar-aslelya-encroachment/