बोरगाव मंजू – गणेश विसर्जन मिरवणुकीला काही दिवस शिल्लक असताना बोरगाव
मंजूमधील पोलीस स्टेशनच्या शांतता समिती बैठकीत मिरवणुकीच्या मार्गावरील
अडचणींचा मुद्दा उपस्थित झाला होता.
याची गंभीर दखल घेत प्रशासनाने बुधवारी पहाटे अतिक्रमण हटवण्याची मोहिम हाती घेतली.
गाव मोठे असल्याने आणि गणेशमूर्तींची संख्या लक्षणीय
असल्याने विसर्जन मिरवणूक मोठ्या प्रमाणावर निघते.
मात्र मार्गावर झालेल्या अतिक्रमणामुळे मिरवणुकीत अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती.
यामुळे सामाजिक तणाव निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,
यासाठी महसूल विभाग, ग्रामपंचायत प्रशासन आणि पोलिसांनी एकत्रित पावले उचलली.
पूर्वी अतिक्रमणदारांना नोटिसा देण्यात आल्या होत्या.
नोटिसा दिल्यानंतरही अतिक्रमण न मिटवल्याने आज प्रत्यक्ष कृती करण्यात आली.
महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी, ग्रामपंचायत प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ही कारवाई सुरू झाली.
यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी वैषाली मुळे,
ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी तैनात होते.
दंगल नियंत्रण पथकाही सज्ज ठेवण्यात आले होते.
कारवाईदरम्यान बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
प्रशासनाच्या या कारवाईमुळे विसर्जन मार्ग मोकळा झाला
असून येत्या गणेशोत्सव मिरवणुका सुरळीत पार पडणार आहेत.
Read also : https://ajinkyabharat.com/sagittarius-business-field/