अकोट- अकोलखेड येथील पोस्ट मास्टर एजाज खान यांच्या पोस्ट
ऑफिसमध्ये नागरिकांच्या लाखों रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे.
नागरिकांच्या तक्रारीनंतर प्रवर विभागाने तपासणी सुरू केली असून भ्रष्टाचाराची पुष्टी झाली आहे.
पोस्ट ऑफिस हे केंद्र सरकारच्या अधिकृत नियमांनुसार चालते
व नागरिकांचा त्यावर पूर्ण विश्वास असतो. मात्र, चौकशीदरम्यान लक्षात आले की,
पोस्ट मास्टरने गावातील लोकांच्या निधीची स्वतःकडे घेतलेली नोंद विलंबित केली,
“प्रिंटर बिघडला आहे”, “संबंधित अधिकाऱ्याची सही बाकी आहे”
असे अनेक कारणे देत रोज दोन दिवसांत पावती देतो”, असे सांगून महिने पुढे ढकलले.
लोकांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात घेऊन
अकोट पोस्ट ऑफिसमध्ये लेखी तक्रारी दिल्या.
ही तक्रारी अकोला प्रवर विभाग, सी. व्ही. रमी रेड्डी यांच्याकडे पोहचल्या.
नागरिकांच्या तक्रारींचा विचार करून प्रवर विभागाने कमिटी स्थापन केली व संपूर्ण खात्याची तपासणी सुरू केली.
तपासणीदरम्यान भ्रष्टाचाराची पुष्टी झाली असून,
किती रुपये गैरव्यवहारामध्ये आहेत हे संपूर्ण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
या मोहिमेत चारही विभागातील आठ डाक अधिदर्शक तपासात सहभागी असून
सी. व्ही. रमी रेड्डी, प्रवर डाक अधीक्षक, अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
गावकऱ्यांनी पोस्ट मास्टर एजाज खानविरोधात कारवाई करण्यासाठी
आणि पैसे परत मिळवून देण्यासाठी दबाव निर्माण केला आहे.
जर योग्य कारवाई झाली नाही, तर कलेक्टर ऑफिसकडे धरणे आंदोलन
करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/mental-chhala-kantun-bams-vidyarthanichi-suicide/