भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त जवान दीपक बोंडे यांचे गावाकडून भव्य स्वागत

गावाचा अभिमान! भारतीय सैन्यातून सेवानिवृत्त जवानाचे भव्य स्वागत

अकोट : तालुक्यातील सावरा गावातील सुपुत्र आर्मी इंजिनियर जवान दिपक पंजाबराव बोंडे हे

भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झाले असून गावात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

जम्मू-काश्मीर, आसाम, पश्चिम बंगाल,

गुवाहाटी अशा संवेदनशील ठिकाणी कार्यरत राहिल्यानंतर ते पुणे येथून सेवानिवृत्त झाले.

गावात काढण्यात आलेल्या भव्य रॅलीची सुरुवात

सावरा बस स्टँड येथील गणेश मंदिरात दर्शन घेऊन झाली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात झाली.

गावातील ठिकठिकाणी सेवानिवृत्त जवानाचे पुष्पगुच्छ देऊन आणि जयघोष करीत स्वागत करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर व

गाडगे महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी गावातील बाळकृष्ण धांडे, भाऊराव धांडे, संघपाल धांडे

तसेच सिद्धार्थ मंडळ यांच्या वतीने जवान दीपक बोंडे यांचा सत्कार करण्यात आला.

गावभरात या स्वागतामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

नागरिकांनी उत्साह, टाळ्यांचा कडकडाट आणि घोषणाबाजी करत आपल्या वीर जवानाचा गौरव केला.

Read also : https://ajinkyabharat.com/firkicha-magistrate-rashid-khanne-t20-cricket-in-history-banla-jagatla-no-1-golan/