फिरकीचा जादूगार राशिद खानने टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास, बनला जगातला नंबर-1 गोलंदाज

नंबर-1 गोलंदाज

अफगाणिस्तानचा फिरकी जादूगार राशिद खान याने टी-20 क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे.

 या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनण्याचा मान आता त्याच्या नावावर जमा झाला आहे.

यूएईविरुद्धच्या त्रिकोणी मालिकेतील सामन्यात त्याने ही ऐतिहासिक कामगिरी साध्य केली.

या सामन्यात राशिदने आपल्या 4 षटकांत 21 धावा देत 3 विकेट घेतल्या

आणि अफगाणिस्तानच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

अफगाणिस्तानने हा सामना 38 धावांनी जिंकला.

टिम साउदीला मागे टाकत राशिद जगातला नंबर-1 गोलंदाज ठरला.

 टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वाधिक विकेट्स

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत आता राशिद खान पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

 राशिद खान – 165 विकेट (98 सामने)

 टिम साउदी – 164 विकेट (126 सामने)

 ईश सोढी – 150 विकेट (126 सामने)

 शाकिब अल हसन – 149 विकेट (129 सामने)

 मुस्तफिजूर रहमान – 142 विकेट (113 सामने)

त्याच्या नावावर 98 सामन्यांत 165 विकेट्स आहेत.

त्याने न्यूझीलंडच्या टिम साउदीला मागे टाकले. साउदीने 126 सामन्यांत 164 विकेट घेतल्या होत्या.

त्याच देशाचा ईश सोढी 126 सामन्यांत 150 विकेट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे.

बांगलादेशचा शाकिब अल हसन (149 विकेट – 129 सामने) चौथ्या,

तर मुस्तफिजूर रहमान (142 विकेट – 113 सामने) पाचव्या स्थानावर आहे.

 अफगाणिस्तानचा मालिकेतील पहिला विजय

अफगाणिस्तान आणि यूएई यांच्यात झालेल्या या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर,

यूएईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी करताना, सेदीकुल्लाह अटल आणि इब्राहिम झदरान यांच्या

अर्धशतकी खेळीमुळे अफगाणिस्तानने 20 षटकांत 4 गडी गमावून 188 धावा केल्या.

संघाकडून इब्राहिम झदरानने 40 चेंडूंत सर्वाधिक 63 धावा

केल्या आणि सेदीकुल्लाह अटलने 40 चेंडूंत 53 धावा केल्या.

189 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना,

यूएई संघ 20 षटकांत फलंदाजी केल्यानंतर 8 गडी गमावून केवळ 150 धावा करू शकला.

संघाकडून मुहम्मद वसीमने 37 चेंडूंत 67 धावांची खेळी केली.

यादरम्यान त्याने चार चौकार आणि सहा षटकार ठोकले.

त्याच्याशिवाय यष्टीरक्षक फलंदाज राहुल चोप्राने 35 चेंडूंत 52 धावा केल्या.

मात्र यूएईचे 7 फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत.

या तिरंगी मालिकेत अफगाणिस्तानचा हा पहिलाच विजय आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/manoj-jarange-patil-of-mumbai-bahir-janar/