मनोज जरांगे पाटील मुंबईबाहेर जाणार का?

आंदोलनाची मुदत संपली; हायकोर्टात सुनावणीला वेग

मुंबई :मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या

आंदोलनाची मुदत संपल्यानंतर आता आंदोलनाच्या पुढील टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याच पार्श्वभूमीवर आज मुंबई उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू झाली आहे.

आरक्षणप्रश्नी न्यायालयीन पातळीवर काय घडते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.

जरांगे पाटील यांचे आंदोलन राजधानी मुंबईत रंगात असतानाच,

ते आंदोलनस्थळीच राहणार की पुढील काही दिवसांत मुंबईबाहेर जाणार, याबाबत चर्चा रंगत आहे.

सरकारसोबत झालेल्या चर्चेचे परिणाम,

न्यायालयीन सुनावणीतील निर्णय आणि आंदोलनाला मिळणारा जनसमर्थन

या सर्व गोष्टी आगामी काळात निर्णायक ठरणार आहेत.

त्यामुळे आंदोलनाचा पुढील मार्ग काय असेल, याकडे नागरिकांची उत्सुकता वाढली आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/jilaha-police-superintendent-archit-chandak-yanchaya-haste-mahalakshmichi-maharati/