सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी!
सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) तर्फे
प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये (RRB) बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे.
या भरतीद्वारे ऑफिस असिस्टंट, ऑफिसर स्केल-I,
II आणि III अशा विविध पदांवर एकूण 13,217 जागा भरण्यात येणार आहेत.
इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 21 सप्टेंबर 2025 ही अंतिम तारीख देण्यात आली आहे.
कोणत्या पदांसाठी किती जागा?
ऑफिस असिस्टंट (Multipurpose) – अंदाजे 8,000 पदे
ऑफिसर स्केल-I (सहाय्यक व्यवस्थापक) – सुमारे 4,000 पदे
ऑफिसर स्केल-II व III – जनरल बँकिंग ऑफिसर, आयटी ऑफिसर,
कायदा अधिकारी, चार्टर्ड अकाउंटंट, मार्केटिंग ऑफिसर, कृषी अधिकारी आदी विशेष पदांसाठी भरती
पात्रता आणि अटी
ऑफिस असिस्टंट व ऑफिसर स्केल-I : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक
ऑफिसर स्केल-II : किमान 50% गुणांसह पदवी/पदव्युत्तर पदवी
कायदा अधिकारी पदासाठी : LLB पदवी आवश्यक
वयोमर्यादा :
ऑफिस असिस्टंट : 18 ते 28 वर्षे
ऑफिसर स्केल-I : 18 ते 30 वर्षे
इतर पदांसाठी नियमांनुसार
अर्ज शुल्क
सामान्य उमेदवार : ₹850
SC/ST/अपंग उमेदवार : ₹175
(फी फक्त ऑनलाइन भरता येणार)
अर्ज कसा कराल?
IBPS च्या अधिकृत संकेतस्थळाला www.ibps.in भेट द्या
दिलेल्या लिंकवर क्लिक करून नोंदणी करा
लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करा
आवश्यक तपशील भरा, कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरा
अर्ज सबमिट करून प्रिंट काढून ठेवा
ही भरती तरुणांसाठी मोठी संधी आहे. लाखोंच्या पगाराची नोकरी मिळवण्याची संधी हातातून जाऊ देऊ नका. 21 सप्टेंबरपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/australia-australia-sangh-jahir/