मोठी बातमी! ट्रम्पची नवी टॅरिफ धमकी,

धमकी

मोठी बातमी!
ट्रम्पची नवी टॅरिफ धमकी, औषधांवर 200 टक्के टॅरिफची तयारी?

नवी दिल्ली :  अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा भारतावर आर्थिक

आघात करण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

नुकताच भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या जवळपास सर्वच वस्तूंवर तब्बल 50 टक्के

टॅरिफ लावल्याने जगभरात खळबळ उडाली होती.

त्यानंतर आता ट्रम्प औषधांवर तब्बल 200 टक्के टॅरिफ लावण्याचा विचार

करत असल्याचे वृत्त काही आंतरराष्ट्रीय अहवालांमध्ये समोर आले आहे.

औषध उद्योगावर मोठा धोका

भारत हा जगातील सर्वात मोठा जेनेरिक औषधांचा निर्यातदार देश आहे.

अशातच जर 200 टक्के टॅरिफ लागू झाले तर भारतीय औषध उत्पादक

कंपन्यांना थेट मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.

निर्यात कोसळेल आणि औषध उद्योगाला मोठा धक्का बसू शकतो.

भारत-अमेरिका संबंध ताणले

टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत-अमेरिका संबंधांमध्ये तणाव वाढल्याचे दिसून येत आहे.

भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी सुरूच ठेवल्यामुळे अमेरिकेची नाराजी वाढली आहे.

त्यामुळेच भारताला आर्थिक दबावाखाली आणण्यासाठी

ट्रम्प प्रशासनाने ही योजना आखल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

मोदींच्या दौऱ्यांवर अमेरिकेची नजर

याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीन दौऱ्यावर जाऊन रशियाचे

अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत बैठक घेतली.

यानंतर अमेरिकेने आणखी आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ट्रम्पचा 200 टक्के टॅरिफचा डाव भारतासाठी आर्थिक संकट ठरणार का,

हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.

Read also : https://ajinkyabharat.com/muthi-baatmi-nagparat-indigochya-vimanachi-emergency-landing-272-pravasi-sukhup/