मोठी बातमी! नागपुरात इंडिगोच्या विमानाची आपत्कालीन लँडिंग; 272 प्रवासी सुखरूप

, पायलटच्या चातुर्याने अपघात टळला

नागपूर : आकाशात उड्डाण घेतलेल्या इंडिगोच्या विमानाला अचानक पक्षी

धडकला आणि काही क्षणातच प्रवाशांच्या  हृदयाचा ठोका चुकला.

नागपूरहून कोलकात्याकडे निघालेल्या या फ्लाइटमध्ये तब्बल 272 प्रवासी होते.

सुदैवाने वैमानिकाने समयसूचकता दाखवत विमानाचं आपत्कालीन लँडिंग करून एक मोठा अपघात टाळला.

हवेत असतानाच झालेल्या या धडकेमुळे विमानाच्या पुढील भागाचं नुकसान झालं.

प्रवाशांमध्ये काही काळ घबराट पसरली होती.

मात्र केबिन क्रूने सर्वांना शांत ठेवण्याचं आवाहन केलं.

अखेर वैमानिकाच्या दक्षतेमुळे सर्व प्रवासी सुखरूप उतरले.

वरिष्ठ विमानतळ संचालक आबिद रूही यांनी सांगितलं की,

इंडिगोच्या नागपूर-कोलकाता 6E812 या विमानाला पक्षी धडकल्याची शक्यता आहे.

घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये पक्ष्याच्या धडकेला गंभीर घटना मानलं जातं.

विशेषतः टेक-ऑफ आणि लँडिंगच्या वेळी बर्ड हिटमुळे विमानाला तांत्रिक अडचणी निर्माण होतात.

 याआधीही २ जून रोजी अशाच प्रकारे रांची विमानतळावर इंडिगोच्या विमानाला बर्ड हिट झालं होतं. त्यावेळी १७५ प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं होतं.

नागपूरमधील या घटनेनंतर पुन्हा एकदा बर्ड हिटच्या घटनांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.