पळसोद: – पळसोद गावात श्री मारुती महाराजांचा हरिनाम सप्ताह यथावत चालत
असून यावर्षी १८७व्या वर्षाची परंपरा शुक्रवार, दिनांक 29/08/2025 रोजी सुरू झाली.
सप्ताहाचे सांगता 05/09/2025 रोजी सकाळी ९ वाजल्यापासून १२ वाजेपर्यंत
जय बजरंग भजन मंडळ व जय गुरुदेव भजन मंडळ यांच्या भजनाने गावभर प्रदक्षिणा घालून पार पडणार आहे.
या वर्षी चाळीस क्विंटल गंगा फळाची भाजी
महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून,
गावकऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रम भव्य स्वरूपात पार पडतो.
पळसोद पंचक्रोशीतील भक्त या सप्ताहात हजेरी लावतात आणि
दिवाळीला येणाऱ्या माहेरवाशिणीही यात्रेत सहभागी होतात.
सप्ताहामध्ये सर्व जाती-धर्माचे एकोप्याचे दर्शन होत असून,
भाविक भक्तांची रेलचेल वाढते. कार्यक्रमाला अधिक शोभा
आणण्यासाठी आयोजकांनी सर्व भजनी मंडळांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/district-student-science-in-science/