केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ऑनलाईन गेमिंग सेक्टरमध्ये सुरक्षितता आणि नियमांचे पालन सुनिश्चित करण्यावर भर दिला
नवी दिल्ली – केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि सरकारी अधिकाऱ्यांनी
ऑनलाईन गेमिंग उद्योगाच्या प्रतिनिधींशी आज ऑनलाईन बैठक घेतली.
या बैठकीत ई-स्पोर्ट्स आणि सोशल गेम्सला प्रोत्साहन
देण्याबरोबरच युजरच्या पैशांचे संरक्षण सुनिश्चित करण्यावर विशेष लक्ष देण्यात आले.
देशातील ऑनलाईन गेमिंग सेक्टर वेगाने वाढत असून,
केंद्र सरकारने या क्षेत्राला नियंत्रित करताना युजरला कोणतीही
हानी होऊ नये यासाठी सक्रिय पावले उचलली आहेत. बैठकीत खालील प्रमुख मुद्यांवर चर्चा झाली:
ऑनलाईन गेमिंगला सुरक्षित कसे बनवले जाऊ शकते?
जे वापरकर्ते पैसे लावून खेळत आहेत, त्यांच्या पैशांची सुरक्षा कशी केली जाऊ शकते?
गेमिंग कंपन्या भारतीय कायद्याचे पालन कितपत करत आहेत आणि त्याची पडताळणी कशी केली जाईल?
केंद्रीय मंत्र्यांनी गेमिंग कंपन्यांना सूचित केले की ग्राहकांनी लावलेल्या पैशांची
सुरक्षितता निश्चित करण्यासाठी आवश्यक ती सावधानता बाळगावी.
काही कंपन्या आधीच नवीन नियमांनुसार बदल करत आहेत.
तज्ज्ञांच्या मते, जर हा उद्योग योग्य दिशेने पुढे गेला, तर देशभरातील युवकांसाठी
रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होतील.
गेम खेळण्यापेक्षा गेम डेव्हलपमेंट आणि तांत्रिक क्षेत्रातही हजारो रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.