अकोला- अकोला शहरातील शिवनी परिसरात ३१ ऑगस्ट २०२५ रोजी
सायंकाळी सुमारे ७.३० वाजता घडलेल्या फर्निचर व्यापारी सुफीयान खान
यांच्या हत्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई
करत सर्व आरोपी ताब्यात घेतले आहेत.
फिर्यादी नामे शेहरे आलम समीरउल्ला खॉ (२६, रा. शिवणी, अकोला) यांनी पोलिसांना
दिलेल्या तक्रारीनुसार, सुफीयान खान आपल्या सोबत साजीद खान व मोहम्मद कैफ बक्शउल्ला खान
यांच्यासह रेल्वे लाईन बोगदा मलकापुर जवळ होन्डाई कारने गेले होते.
तेथे सिगारेट पित असताना मोटारसायकलवर आलेल्या चार अनोळखी इसमांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला.
हल्ल्यात आरोपींनी चाकूचा वापर करून सुफीयान खानच्या पोट व पाठीवर वार केले.
या हल्ल्यामुळे सुफीयान गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
तर साथीदार साजीद खान गंभीर जखमी झाला आहे.
अन्य काही आरोपींनी फिर्यादीच्या नाक आणि तोंडावरही बुक्यांनी मारहाण केली.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपींनी हल्ला मुलगी असल्याची गैरसमजुतीमधून केला होता.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके व २० पोलिसांनी
घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. घटनास्थळ जंगल भागात आणि रेल्वे लाईनजवळ
असल्यामुळे कोणतेही CCTV कॅमेरे नव्हते.
तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने आरोपी फैजान खान मुर्शरफ खान (रा. हाजी नगर शिवणी),
अब्दुल अरबाज अब्दुल इस्माईल (रा. ताज चौक, अकोट),
शोएब अली उर्फ राजा तैयब अली (रा. सैयदपुरा, शिवणी) यांना ताब्यात घेतले.
यानंतर फरार होण्याच्या तयारीत असलेल्या तीन आरोपींना बुलढाणा जिल्ह्यातून मोटारसायकलसह ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व आरोपींनी गुन्हा करण्याची कबुली दिली
असून पुढील तपास पोलीस स्टेशन खदान अकोला करीत आहे.
या प्रकरणाची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक,
अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. शंकर शेळके, पो.नि. विजय चव्हाण, पो.उप.नि गोपाल ढोले,
पोउपनि विष्णु बोडखे यांसह अनेक पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.
पोलीसांच्या तत्पर आणि धडाकेबाज कारवाईमुळे फक्त १२ तासांत आरोपी ताब्यात आले,
ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये न्यायालयीन विश्वास अधिक दृढ झाला आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/gateway-jetty-project/