हिवरा बुद्रुकला अतिवृष्टीचा तडाखा; शेतकऱ्यांची सोन्यासारखी पिके जलमय, पदाधिकाऱ्यांनी फिरवली पाठ

शेतकऱ्यांची सोन्यासारखी पिके जलमय, पदाधिकाऱ्यांनी फिरवली पाठ

हिवरा बुद्रुकला अतिवृष्टीचा तडाखा; शेतकऱ्यांची सोन्यासारखी पिके जलमय, पदाधिकाऱ्यांनी फिरवली पाठ

मानोरा –  तालुक्यातील हिवरा बुद्रुक येथे २९ ऑगस्ट रोजी झालेल्या

अतिवृष्टीने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली.

नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने

शेकडो एकरातील सोयाबीन, कापूस, तुर, संत्रा

यासारखी खरीप पिके पाण्याखाली गेली.

अनेक शेतजमिनी, विहिरी जलमय झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे न भरून निघणारे नुकसान झाले असून,

शासनाने त्वरित सर्वे करून नुकसानभरपाई द्यावी,

अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, तालुक्यातील काही राजकीय पदाधिकारी व शासकीय ताफा या

भागातून गेले तरीही हिवरा बुद्रुककडे पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की –“आमच्या डोळ्यासमोर मेहनतीची पिके वाहून गेली,

पण आमच्या वेदनांकडे कोणीच लक्ष देत नाही.

शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा.”

Read also :https://ajinkyabharat.com/vigauljavil/