‘स्लॅपगेट’चा १८ वर्ष जुना व्हिडिओ लीक; पुन्हा रंगली चर्चा

हरभजनचा संताप अनावर

हरभजन सिंह संतापला : “हा मोदींचा स्वार्थी हेतू…!”

मुंबई – आयपीएल 2008 मधील सर्वात वादग्रस्त क्षणांपैकी एक असलेला

‘स्लॅपगेट’ प्रकरणाचा व्हिडिओ अचानक समोर आल्याने क्रिकेटविश्वात

पुन्हा खळबळ माजली आहे.

हरभजन सिंहने श्रीसंतला दिलेली कानाखालीची

मार झेलणारा हा व्हिडिओ माजी IPL चेअरमन ललित मोदींनी

सोशल मीडियावर टाकल्यानंतर पुन्हा एकदा जुनी आठवण चाहत्यांच्या मनात ताजी झाली.

या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया देताना हरभजन म्हणाला,

“१८ वर्ष जुना व्हिडिओ बाहेर काढणं चुकीचं आहे.

हे एखाद्या स्वार्थी हेतूनं केलं गेलं आहे.

लोक विसरलेली गोष्ट पुन्हा बाहेर काढणं म्हणजे फक्त गैरसोयीचं कारण ठरणार.”

हरभजनने याआधीही अनेकदा त्या घटनेबद्दल खेद व्यक्त करत माफी मागितली आहे.

“ती माझी चूक होती, त्याचं दुःख आहे. आम्ही आता पुढे गेलो आहोत.

गणपती बाप्पाला प्रार्थना केली आहे की पुन्हा असं कधी घडू नये,” असं तो म्हणाला.

दरम्यान, श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरी हिने या व्हिडिओ लीकवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

त्यावेळचे मॅच रिफरी फारुख इंजिनिअर यांनीही,

“मी ही घटना गुप्ततेने हाताळली होती, कधीच वाटलं नव्हतं की हा व्हिडिओ बाहेर येईल,” अशी प्रतिक्रिया दिली.

वरिष्ठ विश्लेषक हर्षा भोगले यांनी सांगितलं की,

“त्या काळात बीसीसीआय आणि आयपीएलने हा व्हिडिओ जाणीवपूर्वक लपवला होता,

कारण त्यामुळे खेळाडूंची प्रतिमा धोक्यात आली असती.”

 २००८ मध्ये झालेल्या या ‘स्लॅपगेट’ घटनेनंतर हरभजनला ११ सामन्यांसाठी निलंबित केलं होतं

Read also : https://ajinkyabharat.com/muthi-baatmi-jarage-andotanavar-hyikortcha-theate-order-4/