मुंबई – मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून मोठी घडामोड झाली आहे.
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाविरोधात दाखल याचिकेवर हायकोर्टात
महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. यावेळी याचिकाकर्ते,
सरकार आणि आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर कोर्टाने थेट
आदेश देत मुंबईतील रस्ते मोकळे करण्यास सांगितले आहे.
कोर्टाचा आदेश : रस्त्यावरून हटवा आंदोलक
कोर्टाने स्पष्ट केले की, “मुंबईतील सामान्य जनतेचे जीवन विस्कळीत होता कामा नये.
रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये. गणेशोत्सव काळात मुंबईकरांना त्रास देता येणार नाही.”
त्यामुळे आंदोलकांना रस्त्यावरून हटवा आणि बाहेरून येणाऱ्यांना मुंबईत प्रवेश देऊ नका,
असे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.
ही कारवाई उद्या दुपारी ४ वाजेपर्यंत पूर्ण करा, असा स्पष्ट इशारा कोर्टाने दिला आहे.
आंदोलनावर घालण्यात आलेल्या अटी
कोर्टाने सांगितले की –
आझाद मैदानाव्यतिरिक्त इतरत्र आंदोलक जमू नयेत.
५ हजारांपेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही.
सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेतच परवानगी.
रात्रीपर्यंत मैदान रिकामे करणे बंधनकारक.
तसेच जरांगे पाटलांची तब्येत बिघडल्यास त्यांना तातडीने उपचार द्यावेत,
जेवण व पाण्याची व्यवस्था सुरू ठेवावी, अशा सूचनाही कोर्टाने दिल्या.
सरकारसमोर नवा पेच
राज्य सरकारने आंदोलन रोखण्यासाठी कोर्टाचा आधार शोधण्याचा प्रयत्न केला.
मात्र, कोर्टाने आंदोलनाचा अधिकार कायम ठेवला आहे.
फक्त नियम व अटींचे पालन करूनच आंदोलन करण्याची परवानगी मिळेल,
असा आदेश कोर्टाने दिला. त्यामुळे सरकारची अडचण वाढली असून
आंदोलकांचा पवित्रा तसाच कायम राहणार आहे.
उद्या सकाळी ९ वाजता या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार असून, पुढील दिशा त्यातून स्पष्ट होईल.
Read also : https://ajinkyabharat.com/taqit-bilamu-kantadarachi-suicide/