“पती, पत्नी आणि वो” – तिघेही पोलिस दलात; अफेअर उघड झाल्याने विभागात खळबळ!

“पती, पत्नी आणि वो”

“पती, पत्नी आणि वो” – तिघेही पोलिस दलात; अफेअर उघड झाल्याने विभागात खळबळ!

 कुशीनगर –“लग्न म्हणजे विश्वास, पण तोच विश्वास डळमळीत झाला तर संसाराच्या पायाला तडे जातात” असे म्हणतात.

अशाच एका घटनेने पोलिस विभागात चांगलीच खळबळ उडवली आहे.

कारण, पती–पत्नी आणि तिचा प्रियकर – तिघेही पोलिस

दलातच कार्यरत असल्याचे धक्कादायक प्रकरण उघड झाले आहे.

लग्नानंतर अवघे नऊ दिवसच संसार

पीडित पतीने दिलेल्या माहितीनुसार,

त्याचे लग्न 6 फेब्रुवारी 2023 रोजी बलिया येथील युवतीसोबत झाले.

चार दिवसांनी विदाईचा कार्यक्रम पार पडला.

मात्र, पत्नी अवघे नऊच दिवस पतीसोबत राहिली.

ती स्वतः कॉन्स्टेबल असल्याने आपल्या ड्युटीवर परतली.

पत्नीचा परपुरुषाशी संबंध?

कासया पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या पत्नीचे,

त्याच ठाण्यातील दुसऱ्या कॉन्स्टेबलसोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप पतीने केला आहे.

“माझ्या पत्नीला भेटायला गेलो, पण तिने दरवाजा उघडायला नकार दिला.

आत कोणी तरी दुसरा आहे, असा मला संशय आला. त्यामुळे मी 112 वर फोन केला,” असे पतीने तक्रारीत नमूद केले.

अर्धनग्न अवस्थेत पकडले गेले!

पोलिसांनी दरवाजा उघडून आत पाहिले तेव्हा पत्नी

आणि प्रियकर अर्धनग्न अवस्थेत आढळले.

हे दृश्य पाहताच पतीचे संतुलन सुटले आणि त्याने प्रियकराला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

अखेर घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

आरोपी प्रियकराला पोलिसांनी चौकीत नेले.

घटस्फोटाची मागणी

या घटनेनंतर धक्का बसलेल्या पतीने पत्नीपासून घटस्फोटाची मागणी केली आहे.

दरम्यान, प्रकरणाची चौकशी सुरू असून, या तिघांमुळे पोलीस विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे.

 नागरिकांचा सवाल : जेव्हा कायद्याचे रक्षण करणारेच नातेसंबंधांचा भंग करतील, तेव्हा विश्वास कुणावर ठेवायचा?

Read also :https://ajinkyabharat.com/risod-taluka-tapine-fananala-health-administration-sleeping/