ऑपरेशन प्रहार अंतर्गत बार्शीटाकळी पोलिसांची धडक कारवाई

कत्तलीसाठी बांधलेले 10 गोवंश वाचले; आरोपी अटकेत

 10 गोवंशांना जीवनदान, आरोपी अटकेत

बार्शीटाकळी –स्थानिक पोलिसांनी ऑपरेशन प्रहार अंतर्गत शनिवारी

रात्री ग्रीन कॉलनी परिसरात मोठी कारवाई करत

अवैधरित्या कत्तलीसाठी बांधून ठेवलेली तब्बल 10 जनावरे जप्त करून त्यांना जीवनदान दिले.

या जनावरांची एकूण किंमत सुमारे ₹3.43 लाख इतकी आहे.

या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक अजय भिमराव वानखडे (36) यांनी फिर्याद दिली.

पोलिसांना गुप्त माहिती मिळताच छापा टाकण्यात आला.

घटनास्थळी बैल, गाई व वासरे आढळली.

जनावरांच्या मालकीचे कागदपत्रे मागवली असता आरोपी

काहीही सादर करू शकला नाही.

त्यानंतर पोलिसांनी जनावरे ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला

असता परिसरातील लोकांनी जमाव जमवून पोलिसांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली.

या कारवाईत एसडीपीओ वैशाळी मुळेपोलिस निरीक्षक प्रविण धुमाळ

यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजय वानखडे,

एएसआय फराज शेख, राजेश जोधारकर, मंगेश महाजन, मनिष घुगे,

अमोल हाके, गणेश पाटील, नामदेव भोरकडे, सुमैया शेख व रुतुजा घुले यांनी सहभाग घेतला.

पुढील तपास सुरु आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/fii-cha-modla-pride-dii-created-vikrami-history-8-mahinanta-five-lakh-kotin/