मुंबई – भारतीय शेअर बाजाराने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी
गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला आहे.
गेल्या काही दिवसांतील घसरण आणि अनिश्चिततेला मागे टाकत
सोमवारी बाजार पुन्हा एकदा चढत्या मार्गावर दिसून आला.
यामध्ये देशांतर्गत गुंतवणूकदारांनी निभावलेली भूमिका ऐतिहासिक ठरली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून जागतिक बाजारात अस्थिरता कायम आहे.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) यांनी भारतीय बाजारातून
मोठ्या प्रमाणात पैसे बाहेर काढले.
मात्र, या दरम्यान देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार (DII) यांनी
खांद्यावर बाजाराची जबाबदारी उचलली.
त्यामुळेच बाजार कोसळण्याऐवजी स्थिर राहिला आणि गुंतवणुकीचा नवा विक्रम रचला गेला.
NSE च्या आकडेवारीनुसार, 2025 च्या पहिल्या आठ महिन्यांत DII नी
तब्बल 5.13 लाख कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. हा सलग दुसरा वर्ष आहे,
जेव्हा देशांतर्गत गुंतवणूकदारांची गुंतवणूक पाच लाख कोटींच्या पलीकडे गेली आहे.
2024 मध्ये त्यांनी 5.25 लाख कोटी रुपयांची खरेदी केली होती.
त्याआधी 2023 मध्ये 1.81 लाख कोटी आणि 2022 मध्ये 2.76 लाख कोटींची गुंतवणूक झाली होती.
दुसरीकडे, FII नी मात्र सलग विक्री सुरू ठेवली आहे.
2024 मध्ये 1.21 लाख कोटी, तर यावर्षी आतापर्यंत 1.6 लाख
कोटी रुपयांची माघार घेतली आहे. तरीही DII च्या विश्वासामुळे बाजाराला आधार मिळाला.
2025 च्या सुरुवातीपासूनच सेन्सेक्स 2.1 टक्क्यांनी आणि
निफ्टी 3.1 टक्क्यांनी वधारले आहेत.
मात्र बीएसई मिडकॅप 3.9% आणि स्मॉल कॅप निर्देशांक
तब्बल 6.8% नी घसरला आहे. तज्ज्ञांच्या मते,
आगामी काळातही DII च्या गुंतवणुकीवरच बाजाराचा तोल टिकून राहणार आहे.
Read also :https://ajinkyabharat.com/womens-world-cup-2025-prij-manit-tabal-297-takkyani-vadhi/