‘एज्युकेट गर्ल्स’ संस्थेला रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2025

‘एज्युकेट गर्ल्स’ला रॅमन मॅगसेसे पुरस्काराने गौरव

बालिकांच्या शिक्षणासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या ‘एज्युकेट गर्ल्स’ (Educate Girls)

या स्वयंसेवी संस्थेला आशियाचा नोबेल म्हणून ओळखल्या

जाणाऱ्या रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले आहे.

या संस्थेची स्थापना सन 2007 मध्ये सुफिना हुसेन यांनी राजस्थानातील पाली जिल्ह्यात केली होती.

ग्रामीण भागातील शिक्षणाबाहेर राहिलेल्या मुलींना पुन्हा शाळेत

दाखल करून त्यांना उज्ज्वल भविष्याची वाट दाखवणे हा या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे.

आजवर ‘एज्युकेट गर्ल्स’च्या प्रयत्नांमुळे राजस्थान,

मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशसह विविध राज्यांमध्ये 20

लाखांहून अधिक मुली पुन्हा शाळेत दाखल झाल्या आहेत.

या कार्यात ‘टीम बालिका’ नावाच्या 23 हजारांहून

अधिक स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग आहे.

हे स्वयंसेवक गावोगाव फिरून शाळाबाह्य मुलींना शोधतात,

त्यांच्या कुटुंबियांना समजावतात आणि त्या मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देतात.

या संस्थेच्या कामाची दोन प्रमुख अंगं आहेत – ‘विद्या’ आणि ‘प्रगती’.

‘विद्या’ अंतर्गत 14 वर्षांपर्यंतच्या मुलींना शाळेत आणण्याचे काम केले जाते,

तर ‘प्रगती’ या उपक्रमांतर्गत 15 ते 29 वयोगटातील तरुणी व महिलांना पुढील शिक्षण,

कौशल्यविकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात.

लिंगभेदाच्या अडथळ्यांना झुगारून मुलींना शिक्षणाचा हक्क

मिळवून देण्यासाठी संस्थेने केलेले कार्य देश-विदेशात आदर्श मानले जात आहे.

या पार्श्वभूमीवर रॅमन मॅगसेसे पुरस्कार समितीने ‘एज्युकेट गर्ल्स’ या संस्थेला यंदाचा सन्मान जाहीर केला.

या पुरस्कारामुळे भारतातील सामाजिक चळवळींना नवा

आत्मविश्वास मिळाला असून मुलींच्या शिक्षणाबाबतचा संदेश

अधिक प्रभावीपणे जनमानसात पोहोचणार आहे.

ग्रामीण भागातील असंख्य मुलींना उज्ज्वल भविष्याचा नवा मार्ग देणाऱ्या

या संस्थेच्या कार्याची दखल घेतला जाणारा हा

पुरस्कार संपूर्ण देशासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/mumbai/