बोरगाव मंजू – येळवण ग्रामपंचायतीत आयोजित ग्रामसभेत गावाला
दारूमुक्त आणि नशामुक्त करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
गावातील महिलांनी पुढाकार घेत ग्रामसभेत दारू विक्री,
दारू सेवन, तंबाखू, गुटखा व मादक पदार्थांवरील संपूर्ण बंदीसाठी ठाम भूमिका मांडली.
ग्रामसभेत सरपंच काजल दिनेश मडावी, उपसरपंच आम्रपाली वाहूरवाघ,
सदस्य वेणूताई चौरुपगार, नंदाताई कुंबरे, नंदा सोनवणे, अनिल मोहिते,
निरंजन गडलिंग यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, बचत गट सदस्य,
आशा सेविका आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी महिलांनी दारूचे दुष्परिणाम स्पष्ट करत गावात
अवैध धंदे त्वरित बंद करण्याची मागणी केली.
सभेच्या अखेरीस सर्व ग्रामस्थ व महिलांनी एकमुखाने ठराव मंजूर
करून गाव नशामुक्त करण्याची शपथ घेतली.
त्यानंतर रॅली काढून घोषणाबाजी करण्यात आली.
महिलांनी “दारू बंदीचाच मार्ग सुखी जीवनाकडे” असा निर्धार व्यक्त केला.
ग्रामस्थांच्या या निर्णयामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून,
तरुणाईचे व्यसनाधीनतेकडे झुकणारे पाऊल रोखले जाईल,
अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Read also :https://ajinkyabharat.com/akolamadhyay-furniture-vyapyahi-nirghran-killing-complex-khabat/