ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे कोसळला ट्रान्सफॉर्मर,शेतकऱ्यांचे  संकट टळले

महावितरणच्या कामावर प्रश्नचिन्ह, ट्रान्सफॉर्मर कोसळला

ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे कोसळला ट्रान्सफॉर्मर ,शेतकऱ्यांचे  संकट टळले

रिसोड –  खडकी सदार परिसरातील शेतात एका वर्षापूर्वी बसवलेला ट्रान्सफॉर्मर

सहा महिन्यांपूर्वीच कोसळल्याने ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी उभा केलेला ट्रान्सफॉर्मर प्रत्यक्षात

येणाऱ्या संकटास हाताळण्यास अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे.

महावितरणने अशा हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांकडे तातडीने

लक्ष देणे आवश्यक असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

सुदैवाने, महालक्ष्मीचा सण असल्यामुळे शेतात कुणीही नसल्यामुळे कोणतीही

अपघाताची घटना घडली नाही.

गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पावसामुळे शेतात ट्रान्सफॉर्मर

पडण्याच्या आणि शेती पिकांचे नुकसान होण्याच्या घटना घडत आहेत.

 31 ऑगस्ट रोजी खडकी सदार येथील सर्वे क्रमांक 228,

शंकर मारोती सदार यांच्या शेतात ट्रान्सफॉर्मर कोसळला.

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या कामावर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Read also :https://ajinkyabharat.com/tua-bhu-bhawan-vishayat-shatru-active-path/