अकोला – अकोल्यातील प्रतिष्ठित व्यापारी घनशाम सोनी यांच्यावरील लाखो
रुपयांच्या ब्लॅकमेल प्रकरणी मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी
मोठ्या चतुराईने बंटी आणि बबली या जोडप्यांना जेरबंद केले आहे.
या घटनेत आरोपींनी व्यापाऱ्यांकडून १८ लाख ७४ हजार रुपये
लुबाडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मूर्तिजापूर तालुक्यातील खरब ढोरे येथील नितेश प्रभाकर थोप
व त्याची पत्नी लता नितेश थोप यांनी अकोल्यातील व्यापारी घनशाम सोनी
यांना आपल्या जाळ्यात फसवून ब्लॅकमेल केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
आरोपींनी व्यापाऱ्याला सोशल मीडियावर बदनाम करण्याची
धमकी दिली आणि राष्ट्रीय महामार्गाजवळील
टोल नाक्यावर रंगेहात १ लाख रुपये घेताना पकडले.
माहितीनुसार, लता थोप हिने व्यापाऱ्याशी बोलण्याचा
फसव्या बहाण्याने संपर्क साधला, त्यास घरी बोलावले आणि त्याला धमकावले.
नितेश थोप हिने आरोपी व्यापाऱ्याचे फोटो आणि व्हिडिओ
असल्याचे भासवून पैसे मागितले.
या घटनेवरून मूर्तिजापूर पोलिसांनी अप क्रमांक २७०/२५
अन्वये कलम ३०८(२), ३०८(६), ३(५) BNS नुसार गुन्हा नोंदविला आहे.
पोलीस निरीक्षक श्रीधर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली उप पोलीस निरीक्षक
चंदन वानखडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई यशस्वी झाली आहे.
या प्रकरणामुळे परिसरात सुरक्षिततेबाबत जागरुकता निर्माण झाली असून,
लोकांना कोणत्याही फसवणुकीच्या तक्रारीसाठी
पोलिसांकडे तत्पर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/breaking-akola-kamganga-naditun-bepatta-mahilecha-deaddeh-sapadla/