आझाद मैदानावर तुफान राडामुंबई – आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात रविवारी मोठी खळबळ उडाली.
खासदार सुप्रिया सुळे मनोज जरांगे यांची प्रकृती विचारण्यासाठी आझाद मैदानावर गेल्या होत्या.
मात्र, बाहेर पडताच आंदोलकांनी त्यांचा घेराव घालत घोषणाबाजी केली.
एवढेच नव्हे, तर सुळे यांच्या कारवर पाण्याच्या बाटल्या फेकल्याची गंभीर घटना घडली.
मनोज जरांगे गेल्या दोन दिवसांपासून आमरण उपोषणावर असून,
या आंदोलनाला राज्यातील अनेक मान्यवरांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला आहे.
त्याच पार्श्वभूमीवर सुळे आझाद मैदानावर पोहोचल्या होत्या.
मात्र, मैदानाबाहेर येताच “एक मराठा, लाख मराठा”
अशा घोषणा देत आंदोलकांनी त्यांना अडवले. काहींनी शरद पवार यांच्याविरोधातही घोषणाबाजी केली.
या गोंधळादरम्यान काही आंदोलकांनी त्यांच्या कारचा पाठलाग केला
आणि बाटल्या फेकल्याचा प्रकार घडला. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
एका आंदोलकाने “शरद पवार यांनी मराठ्यांचे वाटोळे केले” असा थेट आरोप करत संताप व्यक्त केला.
सुप्रिया सुळे मात्र शांत राहिल्या. त्यांनी आंदोलकांना नमस्कार करत त्यांच्या भावना ऐकून घेतल्या.
हसतमुखाने सामोरे जात त्यांनी संयम दाखवला.
आता या घटनेनंतर मनोज जरांगे कोणता नवा संदेश देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/trump-is-dead/