पैलपाडा येथे सुयोग देशमुख मित्र परिवार तर्फे मोफत आरोग्य शिबीर संपन्न

पैलपाडा गावात मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पैलपाडा – गावकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत सुयोग देशमुख मित्र परिवार तर्फे

पैलपाडा येथे दिनांक ३१ ऑगस्ट रोजी रविवारी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरामध्ये सन्मित्र मानस हॉस्पिटल, अकोला  येथील डॉ. राम बुटे व

डॉ. भरत बागेरे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ५५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

यावेळी समाजसेविका सौ. मंगला गावंडे यांचीही विशेष उपस्थिती होती.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला

. सरपंच सौ. वर्षाताई राजेश गऊळ, ग्रामपंचायत सदस्य सौ. दिपालीताई भारसके,

माजी सदस्य सुरेश खंडारे, तसेच राजेश देशमुख, बबनराव देशमुख,

रामराव गावंडे, हमीद भाई, बबन गोगटे, पद्मा देशमुख, पुष्पा गुहे, साधना देशमुख,

देवराव काळंके, रामदास भारसके, प्रसाद देशमुख, विक्की गोरले, विशाल देशमुख,

गोविंदा गुहे, ओम गोमाशे, रोशन पाचपोर, अनिकेत देशमुख, सतीश देशमुख, सुजल गावंडे,

प्रथमेश मोरे, अमर वस्तकार, योगेश भलतीलक, यश सांगळूदकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमामुळे गावातील नागरिकांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता

निर्माण झाली असून आयोजकांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/maratha-reservation-is-obc-unwell/