त्या पोरीने संसार उभा केला होता… बिचारी’ – प्रिया मराठेच्या निधनावर उषा नाडकर्णींच्या डोळ्यात अश्रू

उषा नाडकर्णींच्या अश्रूंनी भारावलं वातावरण

त्या पोरीने संसार उभा केला होता… बिचारी’ – प्रिया मराठेच्या निधनावर उषा नाडकर्णींच्या डोळ्यात अश्रू

मुंबई-  मराठी-हिंदी मालिकांमधून आपली वेगळी ओळख

निर्माण करणारी अभिनेत्री प्रिया मराठे (वय 38) हिचं निधन झालं.

गेल्या दोन वर्षांपासून ती कर्करोगाशी झुंज देत होती.

रविवारी पहाटे चार वाजता तिने अखेरचा श्वास घेतला.

तिच्या अकाली जाण्याने सिनेविश्वात शोककळा पसरली आहे.

‘पवित्र रिश्ता’ मालिकेत प्रियासोबत काम केलेल्या

ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी भावनाविवश झाल्या.

श्रद्धांजली वाहताना त्यांनी भावनिक होत सांगितलं –

त्या पोरीने आता संसार उभा केला होता आणि असं झालं…

बिचारी… हे तिचं जायचं वय नव्हतं… देव तिच्या आत्म्यास शांती देवो.”

उषा नाडकर्णी म्हणाल्या, “मध्ये मी अंकिताला भेटले होते तेव्हा

ठरवलं होतं की, सगळ्यांनी मिळून प्रियाला भेटायला जायचं.

पण शंतनू म्हणाला – तिला भेटायला येऊ नका,

केस जात असतील म्हणून… तरी मी ठरवलं होतं की जाऊन भेटून येऊ.

पण इतक्या लवकर ती जाईल असं वाटलंच नव्हतं. देव असं का करतो कळत नाही मला.”

प्रियाने मराठीसोबत हिंदी मालिकांमध्ये देखील भूमिका साकारल्या होत्या.

‘तुझेच मी गीत गाते’ मालिकेत ती मोनिकाच्या भूमिकेत दिसली होती.

मात्र प्रकृती अस्थिर असल्याने तिला मालिका सोडावी लागली होती.

तिच्या मालिकेतून घेतलेल्या निरोपाचा व्हिडीओ

देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

गेल्या वर्षभरापासून प्रिया सोशल मीडियावर सक्रिय नव्हती.

चाहत्यांना धक्का देत तिचं कर्करोगाशी झालेलं अखेरचं युद्ध अपयशी ठरलं.

संपूर्ण सिनेविश्वातून तिच्या निधनावर हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/akola-district-feminine-route/