रुग्ण- बालकांचे आरोग्य धोक्यात; डीएम कंपनीचा भोंगळ कारभार उघड
अकोला : जिल्हा स्त्री रुग्णालयात स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे
धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
वार्ड क्रमांक १० सहित रुग्णालय परिसरात गेल्या महिनाभरापासून
घाणीचे साम्राज्य असून रुग्ण आणि बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
अकोला जिल्ह्यासह वाशिम, बुलढाणा, खामगाव,
पातूर, मुर्तीजापूर, बार्शीटाकळी आदी भागातून
मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येथे दाखल होतात.
मात्र इतक्या महत्त्वाच्या आरोग्य केंद्रात स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
साफसफाईचा ठेका खासगी डीएम कंपनीला दिला असला
तरी त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून सर्रास निष्काळजीपणा होत आहे.
गेट परिसर, वार्डे, कॉरिडॉर सगळीकडे घाणीचे साम्राज्य असून रुग्ण
व नातेवाईकांना यातून मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
यापूर्वीही माध्यमांतून या गैरकारभाराचा वारंवार उघड झाला होता.
मात्र ठेकेदार, सुपरवायझर तसेच शासकीय जबाबदार अधिकाऱ्यांनी दखल
न घेता बेफिकीरपणे “जे करायचं ते करा” असा प्रतिसाद दिल्याचे समोर आले आहे.
सरकारी रुग्णालयातील या ढिसाळ कारभारामुळे रुग्ण व त्यांच्या
नातेवाईकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
जिल्हा स्त्री रुग्णालयासारख्या महत्त्वाच्या आरोग्य सेवेत सुरू
असलेला हा भोंगळपणा नेमका कुणाच्या मर्जीने चालतो,
हा मोठा सवाल उपस्थित केला जात आहे.
रुग्णालयातील घाणीचं साम्राज्य तातडीने थांबवून स्वच्छतेची काटेकोर
अंमलबजावणी व्हावी, हीच रुग्ण व नागरिकांची अपेक्षा आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/akolidhi-shetkari-putrachi-suicide/